Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संघशताब्दी वर्षानिमित्त तळोद्यात हिंदुत्वाचा हूंकार शहरातून सघोष पथसंचलन,विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा,


संघशताब्दी वर्षानिमित्त तळोद्यात विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
तळोदा दि ४ (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन १०० वर्षे पूर्ण झालीत यानिमित्ताने विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहाने तळोदा येथे पार पडला. 
कार्यक्रमाची सुरुवात शेठ के. डी. हायस्कूल येथून पथसंंचलनाने झाली. शहरातील नागरिकांनी संचलन मार्गावर रांगोळ्या काढून, फुलांचा वर्षाव व फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या हर्ष-उल्हासाने पथसंचलनाचे स्वागत केले. पथसंचलनाचा समारोप माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
 कार्यक्रमाला मंचावर प्रमुख अतिथी आप श्री. जितेंद्र चंद्रसेनजी पाडवी (आपकी जय परिवार, रंजनपुर), प्रमुख वक्ते  धनंजयराव केशव धामणे (देवगिरी प्रांत, कार्यवाह) तसेच  तालुका संघचालक भालचंद्र गोरख माळी उपस्थित होते.
 ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व शस्त्रपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार प्रास्ताविक, परिचय, आभार प्रदर्शन, सांघिक गीत, अमृतवचन, सुभाषित, वैयक्तिक गीत घेण्यात आले. प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात गेल्या शंभर वर्षांच्या इतिहास म्हणजेच ब्रिटिश काळातील संघाच्या सुरुवातीपासून संघाचे कार्य अखंडितपणे चालू असल्याचे तसेच आणीबाणीच्या चळवळीत संघाचे योगदान व त्यातून आजपर्यंत अनेक क्रांतिवीर निर्माण झाल्याचे सांगितले. 
यानंतर प्रमुख वक्ते धनंजयराव धामणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारत देशाच्या इतिहास सांगणे खूप अवघड आहे परंतु काही वर्षांचा धावतापट माहिती करून घेऊ शकतो. 
भारत देशावर आजपर्यंत अनेक आक्रमणे होत आली आहेत आणि भारत त्यांना प्रतिकार करत आला आहे. परकीयांनी भारताच्या मंदिरांवर (श्रद्धास्थान), महिलांवर (देवीचे रूप) आणि गोमाता (माता) अशी तीन प्रकारची आक्रमणे केलीत. गेल्या कित्येक वर्षांपासून भारत देश लढतो आहे परंतु पराजित झाला नाही. आपण टिकून आहोत. असं आपल्यात काय आहे? 

कारण आपण शक्तीसंपन्न, शस्त्रसंपन्न आहोत. शक्तिशाली समाज उभा राहणं खूप आवश्यक आहे. आपण सगळ्या जगाला धर्म शिकवला, माणुसकी शिकवली, हे आपले वेगळेपण आहे. हिंदू समाज संघटितपणे उभा राहिला तर हे सर्वात मोठे शस्त्र आहे. २७ सप्टेंबर १९२५ रोजी संघाची स्थापना नागपूर येथे लहानशा जागेत झाल्यापासून आज संघ ५२ देशांमध्ये जवळजवळ १३०००० शाखा चालवत आहे. समाजात विविध क्षेत्रांमध्ये संघ कार्यरत आहे. संघाची एवढी मोठी व्याप्ती ही केवळ रोज चालणारी शाखा व रोजच्या शाखेतील संस्कार यामुळेच. शताब्दी वर्षात असतांना आम्ही पंचपरिवर्तनाबाबत विचार करणे आवश्यक आहे, यात कुटुंब प्रबोधन, स्वदेशी, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता व नागरिक कर्तव्य यांच्या समावेश होतो. 
आगामी काळात गृह संपर्क अभियान व हिंदू संमेलन हे कार्यक्रम होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. शेवटी सर्वांना आव्हान केले की, आपण सर्वांनी मिळून या भरतभूमीला विश्वगुरू बनवूया. बंधू-भगिनींना विनंती आहे की स्वतःला संघाशी जोडून घ्या.या कार्यक्रमाला जवळजवळ ४०० गणवेशधारी स्वयंसेवक तसेच नागरी वेशात समाजातील ६०० सज्जनशक्ती, मातृशक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी भित्तिपत्रके व पुस्तकांची प्रदर्शनी देखील ठेवण्यात आली होती. संघाची प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.