Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर, अभिनंदनाचा वर्षाव

तळोदा (प्रतिनिधी) तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली.अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
           सन २०२६-२७ करिता तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक माजी अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक सर्वसाधारण बैठक शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्तात्रय सूर्यवंशी भरत भामरे, ईश्वर मराठे, संस्थापक अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सुधाकर मराठे, सम्राट महाजन, किरण पाटील, नरेश चौधरी, वसंत मराठे, हंसराज महाले, दिपक मराठे, नारायण जाधव, महेंद्र सूर्यवंशी, वैभव कर्णकार, हेमंत मराठे आदी उपस्थित होते.  

यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत मराठे व हेमंत मराठे यांनी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्यत्व स्वीकारले,त्यांचा सत्कार करण्यात आला.
                         संघाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम, पत्रकार हिताचे उपक्रम, समस्यांना वाचा फोडणे, विविध काम करण्याचे ठरले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीय गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, महिला दिनानिमित्त महिलांचा सम्मान, पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकारांचा सन्मान तसेच पेपर विक्रेत्याच्या सत्कार, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार आदींसह समाजपयोगी कार्यात तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ अग्रेसर आहे.

      प्रतिक्रिया -
 पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीतून संघटनात्मक बांधणी, समाजोपयोगी उपक्रम, समाज हिताच्या दृष्टीने काम करेन, माझ्यावरील विश्वास माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे.
  मी माझ्यासह संघटनेचे उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने पत्रकार संघाच्या हितासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचा प्रयत्न करीन.

 तळोदा ता मराठी पत्रकार संघ
           अध्यक्ष
      सुधाकर मराठे