नंदुरबार दि ७ (प्रतिनिधी) चौपाळे ता नंदुरबार येथे सामाजिक बांधिलकी जपत गौरव शिंदे (चित्रकथी) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावांतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व पटवून देत शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या शालेय बॅगचे वितरण करण्यात आले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गौरव शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. वाढदिवस केवळ केक कापून साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.यावेळी
प्रमुख शिवाजी चित्रकथी, अशोक चित्रकथी, पांडुरंग चित्रकथी,जंगा चित्रकथी, योगेश भाऊ चित्रकथी, रवींद्र चित्रकथी, दिलीप चित्रकथी, उपस्थित होते.