नंदुरबार दि २ (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा शासकीय रुग्णालय, नंदुरबार येथे रक्तकेंद्र (ब्लड सेंटर) कार्यान्वित आहे. येथे दररोज विविध आजाराचे रुग्ण रक्त संक्रमणासाठी दाखल केले जातात.
सदर रक्त केंद्रामार्फत गोरगरीब व गरजू रुग्णांना रक्त पिशव्या पुरविल्या जातात. समाजातील सिकल सेल/यॅलेसिमिया, कुपोषित मुले/मुली, गर्भवती माता, अपघातग्रस्त व इतर रुग्णांना रक्त दिले जाते. त्यामुळे रक्ताची गरज जास्त प्रमाणात भासत असते. जिल्हयात एकच शासकीय रक्तकेंद्र असल्याने सर्वच रुग्णांना रक्त पिशव्या पुरविणे अडचणीचे होते.
त्यासाठी रक्तदान शिबिरांचे सतत आयोजन करण्यात आले तर जास्तीत जास्त रुग्णांना रक्त पिशव्यांचा पुरवठा करणे शक्य होईल.
या सामाजिक बांधीलकिच्या जाणीवेतून पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रीमती. आश्विनी सानप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 02/09/2026 रोजी सकाळी 08.00 वाजता नंदुरबार पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिरात मा. पोलिस अधिक्षक, नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप यांनी रक्तदात्यांशी संवाद साधून रक्तदान हे श्रेष्ठदान असून, एका रक्तदात्याच्या योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळू शकते. असा संदेश देत स्वतः रक्तदान करुन समाजासमोर आदर्श ठेवला. महिला रक्तदात्यांना उद्येशून सांगितले की, मी आज जसे रक्तदान केले तसे आपणाही स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आव्हान केले व त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले,
रक्तदान शिबीर उत्स्फुर्तपणे पार पाडण्यासाठी मा. पोलिस अधिक्षक, श्रीमती. अश्विनी सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) अशोक कडलग, पोलीस निरीक्षक विवेक पाटील, रा.पो.नि/ किसन राठोड, पोहवा / रविंद्र पवार, पोहवा सचिन चव्हाण, पोशि/ ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पोशि/ गणेश पाटील यांचे महत्वपुर्ण योगदान राहिले असुन शिबिरात एकूण 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर संपल्यानंतर जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी श्रीमती डॉ. रमा वाडेकर व इतर वैदयकीय अधिकारी यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.