शिक्षकांच्या हक्कासाठीचे लढवय्ये बाबासाहेब काळे अनंतात विलीन सोलापूर - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक कै. बाबासाहेब काळे यांच्या शोकसभेचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सोलापूर जिल्हा यांनी आयोजित केला होताशोक सभेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष प्राचार्य. सुनिल पंडित, पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे , आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय बाबासाहेबांना शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिलातर दृकश्राव्य वरून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, नागपूर विभागाचे माजी आमदार नागो गाणार , महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजाताई चौधरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत व भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोदजी तावडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. प्रा .चंद्रात्रे यांनी पाठविलेले शोक संदेश वाचून दाखवण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यकोषाध्यक्ष श्री. राजेंद्र सूर्यवंशी, माजी अध्यक्ष वेणुनाथ कडू पुणे विभाग, अध्यक्ष श्री. नागरगोजे सर, श्री. सोमनाथ राठोड, सुरेशजी राठोड, जितेंद्र पवार, मोहनराव विनायकराव कुलकर्णी तसेच कै. बाबासाहेब काळे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी पुणे विभागातील तसेच संपूर्ण राज्यातून अनेक आजी-माजी पदाधिकारी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.