शहादा कृउबा बिनविरोध करावी असा सभासदांचा सूर सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपकभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभासदांची सभा संपन्न
March 27, 2023
शहादा (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाच्या संचालक मंडळ निवडणुकी निमित्ताने रविवार दिनांक 26/3/ 2023 रोजीच्या बैठकीस परिसराचे नेते, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाडवी शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधवकाका पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील, युवा नेते मयूरभाई दीपक पाटील यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी प्रमुख या बैठकीत उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, व्यापारी, हमाल-मापाडी, विविध संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा संचालक मंडळ निवडणूक मा. बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध व्हावी असा सूर उपस्थित सदस्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.