Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिरसा फायटर्सचा नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्षपदी संतोष वळवी यांची नियुक्ती .... कौतूकांचा वर्षाव

नंदूरबार (प्रतिनिधी)
 बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 मार्च रोजी झालेल्या झूम मिटींग मध्ये संतोष वळवी यांची बिरसा फायटर्सच्या नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.संतोष वळवी यांनी शहादा तालुकाध्यक्ष पदावर चांगले काम केले होते.त्यांचे सामाजिक कार्य बघून सभेत उपस्थित गणेश खर्डे यांनी  व इतर कार्यकर्त्यांनी कार्याध्यक्ष पदासाठी संतोष वळवी  यांचे नाव सुचवले.त्यानंतर महासचिव राजेंद्र पाडवी यांनी अनुमोदन दिले.संतोष वळवी यांची नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष  पदी निवड करत असल्याचे राज्य अध्यक्ष मनोज पावरा यांनी जाहीर केले.राजेंद्र पाडवी महासचिव यांनी संतोष वळवी यांचे प्रथम अभिनंदन केले.
         गणेश खर्डे यांची राज्य उपाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर हे पद रिक्त झाले.म्हणून सक्रीय कार्यकर्त्यास या कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
          मनोज पावरा राज्याध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव, दादाजी बागुल महानिरीक्षक, विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष, कृष्णा भंडारी पुणे जिल्हाध्यक्ष, विजय सहारे नाशिक कार्याध्यक्ष, सुभाष पावरा तळोदा तालुकाध्यक्ष, संतोष वळवी आदी पदाधिकारी सभेत उपस्थित होते.माझ्यावर वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी मी चांगल्या प्रकारे पार पाडीन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित कार्याध्यक्ष संतोष वळवी यांनी दिली.
 नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्षपदी संतोष वळवी  यांची नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष  पदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचे वर्षांत होत आहे.