Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राहूल गांधी यांच्यावरील कारवाई सूडभावनेने केंद्र शासनाचा निषेधार्थ काळ्या फिती लावून तळोदा येथे काँग्रेसचे निदर्शन

राहुल गांधी यांच्यावरील कारवाई सूडभावनेने केंद्र शासनाचा निषेधार्थ तळोदा तहसीलदार परीसरात काँग्रेसचे निदर्शने 

तळोदा दि 27 (प्रतिनिधी) काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील परिसरात केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा विरोधात घोषणा बाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.  
             महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या सुचनांनुसार सोमवारी दू. १२ वाजता माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वात तळोदा तहसील कार्यालय परिसरात काँग्रेसचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निदर्शने केली,  
             केंद्र सरकारने हुकूमशाही पद्तीधने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून सुरु असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाही वरील हल्ला आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधी पक्ष नेत्यांना लक्ष्य करुन भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्व व विचार या विरुध्द भाजप सरकारची वाटचाल सुरु असल्याचे यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले. 
          लोकशाही विरोधी कृत्याचा जाहिर निषेध करण्यासाठी तळोदा कांग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारचा विरोधात घोषण बाजी केली. त्यानंतर तहसीलदार गिरीष वखारे याना निवेदन देण्यात आले.
       यावेळी पद्माकर वळवी यांच्या सह जि.प सदस्या सिमा वळवी, निशा वळवी, तालुका अध्यक्ष नाथ्या पावरा, माजी सभापती नरहर ठाकरे, रोहिदास पाडवी, अर्जुन पाडवी, राणापूर सरपंच दिनेश पाडवी, रेवानगर सरपंच हिरालाल पाडवी, इच्छागव्हाण सरपंच दिपक पाडवी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, प्रकाश ठाकरे, धर्मेंद्र पाडवी ,माजी पंचायत समिती उपसभापती दीपक मोरे ,पंचायत समिती सदस्य हिलाबाई पाडवी ,महेंद्र पाडवी, सचिन राहसे ,अशोक पाडवी, दारासिंग मढवी, पाण्या वळवी ,कादर पावरा, बिंदा पावरा, उदयसिंग पावरा, इमरान शेख ,हिरालाल पावरा ,बाबू सिंग नाईक, राहुल पावरा, रमेश पाडवी, पुनमचंद वळवी, जीवन पावरा, लक्ष्मण नाईक, भगवान पाडवी, भाऊजी पाडवी, सदाशिव ठाकरे ,विनोद पाडवी, महेंद्र पाडवी,आदी उपस्थित होते.