तळोदा (प्रतिनिधी) दिनांक २६ मार्च रोजी तिथी चैत्र शु| पंचमी.(तिथीनुसार) सुर्यवंशी तांबोळी - बारी समाजाचे आराध्यदैवत कर्मवीर संत श्री रूपलाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमा प्रसंगी भविष्यात समाजात आपल्याला सर्वांच्या सुख दु:खात सहभागी होऊन सामाजिक सलोखा, एकोपा, एकमेकांच्या मदतीने आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास तांबोळी बारी समाज सर्व समाज बांधव व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन पुण्यतिथि उत्साहात साजरी करण्यात आली.