Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून रोझवा धरणाचे शेतकऱ्यांना पाणी मिळेल,शेती सूजलाम्,सूजलाम् होईल

तळोदा (प्रतिनिधी)तालुक्यातील रोझवा धरणाच्या  गळतीमुळे पाण्याचा साठा होत नव्हता, परिणामी धरण असूनही परिसरातील भाग पाण्यापासून वंचित होता. 
         आमदार राजेशदादा पाडवी आमदार झाल्यापासून सातत्याने रोझवा डॅम च्या दुरूस्ती साठी शासन दरबारी पाठपुराव्यामुळे दुरुस्ती मंजूर करण्यात आली. 
      आमदार राजेश दादा पाडवी यांनी रोझवा धरणाला भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. 
         यावेळी आमदार पाडवी म्हणाले, रोझवा धरणाच्या  दुरूस्ती मूळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर भूभाग हा सुजलाम सुफलाम होईल शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना याचा फायदा होईल. गूरा ढोरांना पाणी मिळेल.
         उपस्थित शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी  आनंद व्यक्त केला.  अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वास येत असुन आमदार पाडवींचे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले. 
          या प्रसंगी आमदार पाडवींसोबत भाजपा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, रोझवा ग्रामपंचायतीचे सरपंच, लक्कडकोटचे माजी सरपंच जोलू पाडवी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.