तळोदा दि ३१(प्रतिनिधी)
गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शिधा पत्रिका धारक 1 कोटी 63 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केशरी व पिवळे कार्ड असलेल्या नागरिकांना केवळ 100 रुपयात महत्त्वाच्या चार गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.
केशरी कार्ड धारक अर्थात शिक्षापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर,1किलो पामतेल असा शिधा आहे. गुढीपाडव्यापासून पुढील 1 महिनाभर ही योजना सुरु राहील. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
यावेळी उपस्थित आमदार राजेशदादा पाडवी यांचा सत्कार करण्यात आला, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैया परदेशी भाजपा शहराध्यक्ष कैलाश प्रभाकर चौधरी ,अनिल बबनलाल परदेशी जिल्हाध्यक्ष प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन , धान्य गोदाम व्यवस्थापक संदीप परदेशी , माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, घनश्याम कलाल ,चेतन शर्मा ,योगेश पाडवी ,गोविंदा पाडवी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किट संच देण्यात आले अंत्योदय अन्नपूर्णा योजना व प्रधान्य कुटुबातील लाभार्थी यांना किट वाटप करण्यात आले.