इंदौर - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मंदिराची विहरीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३५ झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंदूरचे जिल्हाधिकारी डॉ इलयाराजा टी यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, या घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मध्य प्रदेश पोलीस, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), स्टेट डिझास्टर इमर्जन्सी अँड रिस्पॉन्स फोर्स (SDERF) आणि जिल्हा प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य अजूनही सुरू आहे.
"एकूण 35 लोकांचा मृत्यू झाला, एक बेपत्ता आणि 14 जणांना वाचवण्यात आले आहे. दोन लोक उपचारानंतर सुखरूप घरी परतले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे,इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.
गुरुवारी, इंदूरमधील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात रामनवमीच्या विशेष पूजेदरम्यान एका विहिरीचे छत कोसळले.
18 तास चाललेले हे बचावकार्य गुरुवारी दुपारी 12.30 वाजता सुरू झाले होते असे जिल्हाधिकारी इलायराजा टी यांनी जाहीर केले होते.
याप्रकरणी दंडाधिकारीकरवी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.