Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नाव चोरले ,धनूष्य चोरले , प्रेमभावाची माणसे चोरु शकत नाही देश गिळणा-यांपासून संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढतोय - - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मालेगाव (विशेष प्रतिनिधी) सावरकर आमचे दैवत आहे.दैवताचा अपमान कदापी सहन करणार नाही.चौदा वर्षे रोज मरणयातना सोसल्या असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांना आव्हान केले की, आघाडीत आपण एकत्र आहोत तूम्ही फाटे फोडू नका असे सांगून भाजप आणि शिंदे सरकारचा खरपुस समाचार घेतला .
                 महाराज सयाजीराव गायकवाड काॅलेज मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची जाहीर सभा होती. व्यासपीठावर खा.संजय राउत, अद्वैत हिरे,विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी, विनायक राऊत, सूभाष देसाई, आदी उपस्थित होते.सूभाष देसाई,आ.आमशा पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले.संजय राऊत यांनी उपस्थितांचे कौतुक करत प्रामाणिक, निष्ठावान शिवसैनिक येथे जमले आहेत.खरी शिवसेना पहायची असेल तर निवडणूक आयोगाने येथे येऊन पहावे.शिवसेना वाकलेली नाही,झूकलेली नाही,तूटलेली नाही हा संदेश देशाला देण्यासाठी मालेगावात सभेचे आयोजन केले आहे.
                  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले की,नाव चोरले, धनूष्य चोरले,माझी प्रेमाभावाची माणसे चोरू शकत नाही.मी मूख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही.जनतेचा प्रश्नांसाठी लढतोय आणि जिंके पर्यंत लढणार आहे.उपस्थितांना प्रश्न विचारला कांद्याला भाव आहे का? हो आहे एक कांदा पन्नास खोक्याला विकला गेला.आ.सूहास कांदे यांचे नाव न घेता टोमणा मारला.आपले मूख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून शेतात जातात.इकडे शेतकऱ्यांना वीज नाही, शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, द्राक्ष नासली,कांदा कूजला, शेतमालाला हमी भाव नाही, शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत.शासनाची मदत नाही.तिकडे गद्दार हातात भगवा घेवून नाचत आहेत.महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग मंत्रालय दिल्लीला हलवले.महाराष्ट्राचे वस्त्रहरण केले.किती फसवणार किती अवहेलना करणार कोणत्या प्रकारचे सरकार आहे असा प्रश्न उपस्थित केला.निवडणूक आयोगाने खेड, मालेगावची सभा बघावी आणि नंतर शिवसेना कूणाची सांगावे.निवडणूक आयोगाच गांडूळ झाले आहे या शब्दात खरडपट्टी काढली.केंद्र सरकार न्यायालयाला ही आपले बटीक बनवण्याचा प्रयत्न करीत आहे.पण रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश शिल्लक आहेत.भाजपाला आव्हान देत सांगितले की,तूमची एकशे बावन्न कूळे स्वर्गातून उतरली तरी ठाकरे पासून सेना चोरु शकणार नाही.संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत.स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा संबंध नाही.ते देश गिळायला निघाले आहेत.सांगत भाजपावर टिकास्त्र डागले.