Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जीवाचे रान करून शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचे आवाहन नंदुरबार (प्रतिनिधी)- माजी आमदार तथा धुळे-नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले आहे. कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेच्या झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सीबी गार्डनच्या डोममध्ये माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे यांनी केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, जनतेच्या विश्वासावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत. सध्या विकास सोसायटीमध्ये ३०० सभासद जास्त असल्याने तेच मतदार बाजार समितीच्या ११ सदस्यांना निवडून आणणार आहेत. मागील पंचवार्षिक मध्ये विरोधी गटाचे २ उमेदवार निवडून आले होते. यावेळी व्यापारी गटातून दोन्ही उमेदवार देखील शिवसेनेचे निवडून येतील. निवडणुकीची भीती नसून कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणुका लढवायच्या आहेत. उमेदवार देतांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी निश्चित करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा करायची आहे कांदा खरेदी केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले.नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात कांद्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कांद्याचे खरेदी केंद्र सुरू करावे अशी इच्छा होती. परंतु, ते दुर्दैवाने झाले नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये कांद्याच्या लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. मेळाव्यात जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, जि.प सदस्य देवमन पवार,माजी सभापती विक्रमसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे यांनी केले.*चौकट**मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला* शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल मदत करण्याच्या निर्णय घेतलेला आहे.शिंदे गटाच्या शिवसेनेचे सदस्य नंदुरबार तालुक्यात जास्त निवडून आल्याने ग्रामपंचायतींना निधीची मागणी केली होती. मागणीची दखल घेत राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीला ३० लाखाच्या निधी प्राप्त झाल्याचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.प्रसंगी ॲड.राम रघुवंशी म्हणाले,कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांना विविध आमिषे दाखवण्यात येतील. त्या आमिशांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन शिवसेनेच्या झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी केले.