हरिद्वार - राहूल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकविसाव्या शतकातील कौरव संबोधल्याने हरिद्वार न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.सूरत न्यायालयाचा निकाल पाहता या न्यायालयात काय? या बाबत तर्क लावले जात आहेत.
स्वयंसेवक संघ कार्यकर्त्याने संघटनेला '21 व्या शतकातील कौरव' संबोधल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हरिद्वार न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. रा स्व संघ कार्यकर्ते कमल भदौरिया यांच्या वकिलाने सांगितले की, त्यांच्या अशिलाने भारतीय दंड संहितेच्या IPCकलम 499 आणि 500 अंतर्गत रा स्व संघ विरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याबद्दल न्यायालयात खटला दाखल केला आहे. ९जानेवारी २०२३ रोजी हरियाणातील "भारत जोडो " यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी '21 व्या शतकातील कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि शाखा चालवतात' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या पाठीशी देशातील दोन ते तीन श्रीमंत लोक उभे आहेत.
न्यायाधीश शिव सिंह यांनी फिर्यादीला सुनावणीसाठी 12 एप्रिल 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. भदोरिया यांच्या वकिलाने सांगितले की, राहुल गांधींनी रा स्व संघाची तुलना
21व्या शतकातील कौरव म्हणून केली हे त्यांचे बोलणे अशोभनीय आहे.यातून त्यांची मानसिकता दिसून येते त. रा स्व संघ ही अशी संघटना आहे, जी देशातील कोणत्याही संकटाच्या काळात मदतीसाठी अग्रेसर असते. कमल भदोरिया यांच्या या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, 'राहुल गांधी म्हणाले की हा देश संन्याशांचा आहे, पुरोहितांचा नाही. असे सांगून त्यांनी सनातन्यांची तपस्वी आणि पुरोहितांमध्ये विभागणी केली. त्यामुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. या तक्रार अर्जात राहुल गांधींवर खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.