Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीचे भाजपाला आस्मान दाखवण्याचे आव्हान - अजित पवार

छत्रपती संभाजीनगर  - महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट आहे.भाजपाला आस्मान दाखवण्याचे आव्हान अजित पवार यांनी केले यावेळी मंचावर उपस्थितांनी मूठ बाधून उपस्थितांसमोर हात उंच केले..
                    कार्यक्रमाचे सूरुवातीला प्रबोधनकार ठाकरे व माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांना पूष्पहार अर्पण केले.आम्हाला सगळ्याच महापुरुषांबद्दल आदर आहे. गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण दुटप्पी राजकारणाला आमचा विरोध आहे. तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा काय मूग गिळले होते की दातखीळ बसली होती? असा घणाघाती प्रश्न करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट असल्याचे सांगून भाजपला अस्मान दाखविण्याचं आवाहन उपस्थितांना केले.
           नूकतेच विधानसभेचे अधिवेशन झाले. आम्ही प्रत्येक वंचित घटकांचा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सभागृहात आवाज उठवला. अवकाळी, पीक विमा, कांद्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष केला. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे नमलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय का? असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला.
        ज्या संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना सहापैकी पाच आमदारांनी दणका दिला, जिथे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं, त्याच संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची सभा पार पडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे महत्त्वाचे नेते सभेला उपस्थित होते. सूभाष देसाई,चंद्रकांत खैरे, धनंजय मुंडे, अजित पवार, अशोक चव्हाण आ.विक्रम काळे उपस्थित होते.यांचे बोलून झाल्यावर अजित पवार बोलले,. त्यांनी पीकविमा, अवकाळी, कांदाप्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम, गौरव यात्रा अशा मुद्द्यांवरुन जोरदार फटकेबाजी करुन भाजपला लक्ष्य केलं.महाविकास आघाडी तर्फे बॅनरबाजी करण्यात आली होती.