Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्या सहयोग संस्थेत म.फूले जयंती साजरी

तळोदा दि ११( प्रतिनिधी
विद्यासहयोग  बहुउद्देशीय संस्था तळोदा संचलित व एस. एन. डी. टी. संलग्नित त्रिमूर्ती महिला महाविद्यालयात,आमलाड येथे  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमांच्या सुरुवातीस महात्मा फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.एस.आर . मगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण   करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थीनी  अवंतिका पाडवी हिने महात्मा फुले यांचे जीवन परिचय यावर आपले वक्तृत्व सादर केले  निकिता पाडवी आणि रुचिता राजपूत हिने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काव्य वाचन केले त्यानंतर प्राध्यापिका अश्विनी माळी यांनी आपले मनोगतातून महात्मा फुले  यांच्या कार्या विषयी माहिती दिली प्राध्यापिका अंजुम पिंजारी यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची माहिती दिली यानंतर चेतना माळी यांनी सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या जीवन वृत्तांत सांगितला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस आर मगरे यांनी महात्मा फुले हे सामाजिक कार्यकर्ते, दलितांचे कैवारी, स्त्री शिक्षणासाठी प्रेरणा देणारे अनेक कुप्रथांना बंद करणारे समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला समानतेची वागणूक देणारे होते असे सांगितले प्रास्ताविक प्राध्यापिका रामेश्वरी बत्तीसे यांनी तर आभार प्रा.किरण वळवी यांनी मानले.