Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तलावडी आश्रमशाळेची गूणगौरवाची परंपरा कायम

तळोदा दि ११( प्रतिनिधी
पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तलावडीने यावर्षीही गुणगौरवाची परंपरा अबाधित राखली. संस्थेच्या विज्ञान विभागामार्फत दरवर्षी सिल्वर झोन नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये सायन्स ओलंपियाड च्या परीक्षांचे आयोजन करण्यात येते. शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबतच आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्यातील वैद्यकीय ,अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी स्पर्धा परीक्षांची  तयारी व्हावी यासाठी या परीक्षांचे आयोजन केले जाते. सदर  परीक्षेच्या तयारीसाठी वर्षभर विशेष जादा तासिकांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आश्रमशाळा तलावडीतील एकूण 75 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला होता. प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी पैकी इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी गायत्री नारसिंग वळवी हिने सुवर्णपदक तर अंजली आपसिंग पाडवी व रवींद्र राजा वळवी  यांनी रौप्य पदक व रोशन गोवा ठाकरे या विद्यार्थ्यांने कांस्यपदक प्राप्त केले. वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह परीक्षा उत्तीर्ण केली .पदक विजेते व विशेष प्राविण्यासह परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुहासदादा नटावदकर यांनी कौतुक केले आहे. सदर परीक्षेच्या यशस्वीतेसाठी सायन्स ओलंपियाड परीक्षेचे संस्थेचे समन्वयक श्री प्रकाश चौधरी सर यांचे सहकार्य लाभले. आश्रमशाळा तलावडी येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक   प्रकाश साळुंखे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीवन पवार सर व अधीक्षक  प्रवीण वसावे यांनी प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव केला. या विद्यार्थ्यांना वर्षभर विज्ञान विभागाच्या प्रमुख श्रीमती बबीता गावित मॅडम यांनी  तसेच सायन्स ओलंपियाड तलावडीचे समन्वयक  दशरथ पाडवी सरांनी विशेष मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीमती काश्मिरा पाटील, श्री दिलीप पाटील,  अमोल पाटील, श्रीमती धनश्री आजगे,  साईनाथ वळवी ,श्रीमती अलका तिडके, श्रीमती नीता पावरा ,राहुल जोशी, विजय मलाये यांनी प्रेरित केले.