तळोदा दि ११( प्रतिनिधी) महात्मा फुले हे येथील बहुजनांचे आराध्य दैवत आहेत. अस्पृश्योधाराच्या व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ फुले यांनी रोवून खऱ्या अर्थाने बहुजनांच्या दुःखाचं निदान केले व व त्यानंतर त्यांना गुरु म्हणून अनेक समाजसुधारकांनी बहुजनांच्या दुःखावर उपाययोजना सुचवल्या असे मत प्रा जयपाल शिंदे यांनी व्यक्त केले.
तळोदा शहरातील स्मारक चौकात महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने संयुक्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रा शिंदे बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरजितराजे बारगळ, तहसीलदार गिरीश वखारे, प्रगतिशील शेतकरी निसारअली मक्राणी,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे तळोदा शाखा उपाध्यक्ष तारा मराठे,माळी समाज अध्यक्ष अनिल माळी, प्रभारी पोलिस निरीक्षक अमित बागुल,संयुक्त जयंती उत्सव समितीचे निमंत्रक डॉ डी बी शेंडे,आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रा शिंदे पुढे म्हणाले की,महात्मा फुले यांच्या विचारांची पूर्वी नव्हती इतकी गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांच्या वारसा आपण पुढच्या पिढ्यांना द्यायला हवा. त्यांचे साहित्य,त्यांचे जीवन चरित्र तरुणांना वाचायला देऊ या, त्यांच्या विचारांचा प्रभाव प्रसार करूया आणि हीच आपली खरी त्यांना अभिवादन ठरेल. याप्रसंगी निसार मक्राणी, तारा मराठे,यांनी देखील मनोगत व्यक्त केले.डॉ डी बी शेंडे यांनी प्रास्ताविकातून तळोदा शहरात महापुरुषांच्या विचारांची रुजवून करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगितली.
दरम्यान, या कार्यक्रमात 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शासनाने सुट्टी जाहीर करावी या मागणीचे पोस्टर दाखवण्यात आले.कार्यक्रमाला कलाल समाजाचे अध्यक्ष बापू कलाल, संतोष केदार,अशोक जाधव,डॉ किशोर सामुद्रे, सिद्धार्थ महिरे,प्रवीण जोहरी, दिलीप सोनार रामोळे, मनोज कुंभार,घनश्याम चौधरी,राजेंद्र लांबोळे, सुभाष शिंदे,आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार मुकेश कापुरे यांनी केले. यशस्वीतेसाठी हंसराज महाले,प्रा.मुकेश जावरे,अमोल पाटोळे, सिद्धेश्वर गायकवाड,महेंद्र सामुद्रे आदींनी परिश्रम घेतले.