महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला. त्यांचे कुटुंब फुलांचे गजरे बनवत असंत त्यामुळेच महात्मा फुलेंच्या कुटुंबियांचं आडनाव फुले असं झालं. ज्योतिबा फक्त एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.ज्योतिबा फुले यांनी काही काळ मराठीतून शिक्षण घेतले. काही नाठाळ लोकांनी सांगितल्यामुळे महात्मा फुले यांच्या शिक्षणात काही काळ खंड पडला, मात्र मुलगा कुशाग्र बुद्धीमत्तेचा धनी आहे हे समजल्यावर पुन्हा एकदा फुलेंचा अभ्यास सुरू झाला. वयाच्या २१व्या वर्षी इंग्रजीचा सातवीचा अभ्यास महात्मा फुलेंनी पूर्ण केला. देवासमोर स्त्री-पुरुष दोघांचेही अस्तित्व समान आहे, हे ज्योतिबा फुले यांनी जाणले होते. अशा परिस्थितीत स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना समाजात मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी १८५४ पुण्यात पहिली स्त्रीयांसाठीची शाळा भिडेवाड्यात सुरू करण्यात आली. ही देशातली पहिली मुलींची शाळा होती.शाळेत शिकवण्याची जबाबदारी त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली.ज्योतिबा फुले यांनी समाजातील मागासलेल्या घटकांना आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी 'सत्यशोधक समाज' स्थापन केला. त्यांच्या समाजसेवेने प्रभावित होऊन १८८८ मध्ये मुंबईत झालेल्या एका सभेत त्यांना ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली.
ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणांशिवाय विवाहाला पुरस्कृत केलं. काही काळानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. एवढेच नाही तर विधवा विवाहाचं समर्थन आणि बालविवाहाला त्यांनी कडाडून विरोध केला१८७३ मध्ये जोतिबा फुले यांचे ‘गुलामगिरी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक अगदी मोजक्या पानांचे असले तरी त्यात नमूद केलेल्या विचारांच्या आधारे दक्षिण भारतात अनेक चळवळी सुरू झाल्या.
गुलामगिरी' व्यतिरिक्त ज्योतिबा फुले यांनी 'तृतीयरत्न', 'छत्रपती शिवाजी', ‘शेतकऱ्यांचा आसूड’ अशी अनेक पुस्तके लिहिली.ज्योतीबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने कृषी कायदा मंजूर केला.म
हात्मा ज्योतिबा फुले यांचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.