Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत अपहार प्रकरणी गून्हा दाखल करा अन्यथा आंदोलनाचा इशारा भूषण पाडवी यांनी दिला आहे

अक्कलकुवा दि ११(प्रतिनिधी)
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०१९ या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा परिषदेने आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. कारवाई कडे दुर्लक्ष होत असल्याने भूषण किर्तीकूमार पाडवी यांनी कारवाई साठी निवेदन दिले आहे.
       अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील तत्कालीन एक सरपंच, दोन प्रशासक, तीन ग्रामसेवक, दोन ग्रामसेवक आणि १ माजी उपसरपंच यांनी गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी महेश पोतदार यांना अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही गटविकास अधिकारी कामकाज करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार आहे. सोमवारी सायंकाळी त्यासंदर्भातील एक पत्र काढून गुन्हे 'दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही त्यांनी गुन्हे दाखल न केल्यास त्यांना तेथून हटवून पुढील कामकाज केले जाईल.
 मुख्य कार्यकारी अधिकारी, रघुनाथ गावडे यांनी आदेश काढले आहेत.
      तत्कालीन प्रशासक जे. एस. बोराळे, एम. आर. देव, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, सरपंच उषाबाई प्रवीण बोहरा, ग्रामविकास अधिकारी आनंदा ओजना पाडवी यांच्यासह २०१६ ते २०१९ या काळातील पेसा अबंध निधी ग्रामकोष समितीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत.

२०१६ ते २०१९ दरम्यान लेखापरीक्षण जिल्हा परिषदेने केले आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२१ या काळात हा गैरव्यवहार झाल्याने चौकशी झाली होती. परंतु २०१९ नंतरचे दप्तर चोरीला गेल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास अद्याप अपूर्ण असल्याने २०२० २०२१ या कालावधीतील गैरव्यवहारप्रकरणी कारवाई होवू शकलेली नाही. लवकरच याबाबतही कारवाई होणार असून यातील दोषीविरोधात प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
        कोटी ३४ लाख ७९ हजार रुपयांची दाखल करण्याचे आदेश दिले होते. ३१ सोमवारी गुन्हे दाखल होण्याची गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण न कारवाईकडे लक्ष लागून आहे. या अनियमितता झाल्याचे जिल्हा परिषदेने मार्च रोजी काढलेल्या आदेशानंतर शक्यता असल्याने कारवाई न झाल्याने केल्यास जिल्हा परिषदेकडून प्रकरणी गटविकास अधिकारीच केलेल्या लेखापरीक्षणातून समोर आले तातडीने कारवाई अपेक्षित आहे तातडीने गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलनाचा इशारा भूषण किर्तीकूमार पाडवी यांनी दिला आहे.