तळोदा दि ११(प्रतिनिधी) आमलाड- बोरद रस्त्यावर मोड जवळ अपघातात गंभीरपणे जख्मी झालेल्या इसमाचे उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात निधन झाले. तळोदा पोलिसांत अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रतिलाल सुभान खर्डे (वय ५५, रा. तुळाजा) स्कूटर (एमएच ३९, एएफ ६३४८) ने दि २१ मार्च रोजी आमलाड कडून मोड गावाकडे जात होता. त्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जख्मी झाल्यानें. उपजिल्हा रुग्णालय तळोदा प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर प.रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश सतीलाल खर्डे (रा. डोंबिवली, ह.मु. तुळाजा, ता. तळोदा) यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार तपास करीत आहेत.