वैवाहिक वाद विषय प्रकरण स्थानिक न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश
April 10, 2023
छत्रपती संभाजीनगर दि १२ मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे वैवाहिक वाद विषय प्रकरण वर्ग करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश रूपा विजय हंचीनाळ, राहणार सोलापूर, हिने पती विजय कल्याणअप्पा हंचीनाळ, राहणार औरंगाबाद, यांच्याविरुद्ध माननीय मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, येथे पतीने माननीय न्यायालय, औरंगाबाद, येथे दाखल केलेले विविध प्रकरण माननीय न्यायालय, सोलापूर, येथे वर्ग करण्यासाठी एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत अर्ज दाखल केले होते. थोडक्यात माहिती अशी कि, विवाह नंतर दोन्ही पक्षकारांमध्ये शुल्लक कारणांवरून मतभेद वाढत गेले. दोन्ही पक्षकारांनी एक दुसऱ्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. पतीनेही माननीय न्यायालय, सोलापूर, येथे दाखल केलेले प्रकरण माननीय न्यायालय, औरंगाबाद, येथे वर्ग करण्यासाठी अर्ज दाखल केले होते. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (माननीय न्यायमूर्ती श्री. एस. सी. मोरे) यांनी पतीने माननीय न्यायालय,औरंगाबाद, येथे दाखल केलेले विविध प्रकरण माननीय न्यायालय, सोलापूर, येथे वर्ग करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. पत्नीतर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.