अक्कलकुवा दि १०(प्रतिनिधी) सोरापाडा व अक्कलकुवा येथे हाय मस्ट लॅम्पचे लोकार्पण विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
सोरापाडा गृप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अंजु पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सोरापाडा गावात वेगवेगळ्या तीन ठिकाणी हाय मस्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच अक्कलकुवा शहरात हाय मस्ट लॅम्प बसविण्यात आले आहेत या हाय मस्त लॅम्पचे लोकार्पण विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अक्कलकुव्याच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील इंदिरानगर तसेच केशवनगर येथे हाय मस्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे, उपसरपंच इम्रान मकरानी, तुकाराम वळवी, माजी सरपंच अमरसिंग वळवी, बापु महिरे, किरण चौधरी, रावेंद्रसिंह चंदेल, गोलु चंदेल, लक्ष्मण साळवे, अमोलसिंह राणा, रोहीत सोनार, रोहित चौधरी, मोहसीन मक्राणी, दीपक मराठे आदी उपस्थित होते. मोलगी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत सोरापाडा व अक्कलकुवा येथे हाय मस्ट लॅम्प बसविण्यात आलेत.