तळोदा दि ४(प्रतिनिधी) तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामांकन दाखल करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी उपस्थित होते.यामूळे निवडणूक चूरशीची ठरणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे.
बाजार समिती नामांकन दाखल करण्याचा दि ३ शेवटचा दिवस होता.इच्छुकांची भाऊगर्दी होती.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नामांकन दाखल केले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी उपस्थित होते.त्यानी यावेळी वार्तालाप करताना सांगितले की, निवडणूक असली की,लढवणे पक्षाची जबाबदारी असते.त्यादृष्टीने पक्षातल्यां कार्यकर्त्यांचे नामांकन दाखल केले.