तळोदा दि ४(प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, सोबतच डॉ शशिकांत वाणी,अजय परदेशी, यांच्या उमेदवारीने चर्चा, उत्सूकता, आणि राजकीय विरोधकात अस्वस्थता आहे.या वेळी माजी नगराध्यक्ष भरत माळी उपस्थित होते.प्रसंगी बोलताना आमदार राजेश पाडवी म्हणाले, निवडणूक लढवायची असल्याने सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत.भरत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार असा निर्धार व्यक्त केला.
कृउबा निवडणुक नामांकन दाखल करण्यासाठीची मूदत आज संपली.६ ते २० एप्रिल छाननी आणि माघार आहे.नामांकन दाखलचा शेवटचा दिवस असल्याने तालुक्यातील गावागावातून लोकांनी गर्दी केली होती.भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य, आमदार,माजी नगराध्यक्ष यांनी नामांकन दाखल केल्याने निवडणुकीचे म्हत्व वाढले असून,सर्वच जागांवर उमेदवार दिल्याने, निवडणूक बिनविरोधची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे.इतर पक्षातील अनेक दिग्गजांनी नामांकन दाखल केल्याने उन्हाचा तिव्रते सोबतच निवडणुकीचे तापमान वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे