Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृउबा अठरा जागांसाठी श्याऐंशी नामांकन दाखल, प्रसंगी दोन आमदारांची उपस्थिती लढतीत चूरशीची शक्यता

तळोदा दि ४(ता प्र) तळोदा क‌षी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी श्याऐंशी नामांकन दाखल करण्यात आले आहेत. आपापल्या कार्यकर्त्यांचे अर्ज दाखल करण्यासाठी दोन आमदारांची उपस्थिती निवडणूक चूरशीची होईल असे चित्र आजतरी आहे.
        तळोदा कृ उ बा स निवडणुकीसाठी या आधी १४ आज नामांकन दाखल करण्याच्या  शेवटच्या दिवशी ७२ नामांकन दाखल झालेआज एकूण ८७ नामांकन दाखल झाले आहे बुधवारी छाननी आहे.
      तळोदा कृ उ बा  निवडणुकीसाठी 18 जागेसाठी 132 नामांकन विक्री झाले होते. नामांकन दाखल शेवटच्या मुदतीत एकूण 86 नामांकन दाखल झाले आहेत आज दिवसभर नामांकन दाखल करण्यासाठी विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते इच्छूकांनी गर्दी केली होती
आमदार राजेश पाडवी यांनी उमेदवारी दाखल केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे सहकारी संस्था मतदार संघ 11 जागांसाठी 49 अर्ज, ग्रामपंचायत 4 जागांसाठी 20 अर्ज, व्यापारी व अडत्या मतदार संघात 2 जगांसाठी 11अर्ज व हमाल मापाडी मतदार संघ 1 जागेसाठी 6 अर्ज दाखल झाले आहे
              शिवसेनेच्या उमेदवारांची उमेदवारी दाखल साठी आमदार आमश्या पाडवी व भाजपाचे इच्छूकांची अर्ज दाखल साठी आमदार राजेश पाडवी  उपस्थिती होती 
           दरम्यान आमदार राजेश पाडवी तसेच विधान परिषद  आमदार आमश्या पाडवी माजी नगरअध्यक्ष तसेच माजी सभापती भरत माळी , माजी नगराध्यक्ष अजय परदेशी
डॉ शशिकांत वाणी ,माजी नगरसेवक संजय माळी . शिवसेनेचे  तालुका प्रमुख अनुप उदासी ठाकरे सेनेचे जीतेंद्र दुबे. माजी नगरसेवक जितेंद्र माळी ,नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय  आनंद सोनार  सूरज माळी आदी उपस्थित होते