तळोदा दि ४ (प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भाजपा कडून सावरकर गौरव यात्रा तळोदा येथे काढण्यात आली."मी सावरकर" असा घोषणा देण्यात आल्या.
आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी , भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी नगरसेवक संजय माळी, जितेंद्र सूर्यवंशी, हेमलाल मगरे,गौरव वाणी, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी,किसान मोर्चा प्रदेश चिटणीस श्याम राजपूत,महेंद्र पाटील, ,,प्रदीप शेंडे, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी,प्रतापपूरचे सरपंच पंकज पावरा, कैलास चौधरी,नारायण ठाकरे,प्रकाश माळी, कपिल कर्णकार,बळीराम पाडवी,आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
शहरातील दत्त मंदिर येथून स्मारक चौक मार्गे बिरसा मुंडा यांच्या स्मारकापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. सावरकरांच्या प्रतिमेसह ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत ग्रामीण भागातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. हातातील ध्वज व मी सावरकर या आशयाचे टी-शर्ट सहभागी झालेल्यांनी परिधान केलेले टी-शर्ट यांनी शहरवासी यांचे लक्ष वेधून घेत होते..