तळोदा दि ४( प्रतिनिधी)तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीने वरिष्ठ नेत्यांचा आदेशानुसार माजी आमदार, तसेच बाजार समितीचे चेअरमन उदेसिंगदादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली " शेतकरी पॅनल " या बॅनरखाली निवडणुक लढविण्याचे प्रसिद्धीस देत उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.
सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदार संघ व हमाल मापाडी मतदार संघ, ह्या सर्व मतदार संघातुन एकुण 18 अर्ज दाखल केले आहे.असे प्रसिद्धपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
सोसायटी मतदार संघ - मराठे प्रल्हाद मोतीराम,(सोसायटी सर्वसाधारण)मराठे धनराज आनंदा,(सोसायटी सर्वसाधारण)
मराठे लताबाई प्रल्हाद,(महिला राखीव)वळवी पुनमचंद ओंकार,(सोसायटी अनु.जमाती)चव्हाण पुरुषोत्तम रामदास,(सोसायटी सर्वसाधारण)
क्षत्रिय हितेंद्र सरवनसिंग(सोसायटी सर्वसाधारण),गायकवाड शांतीलाल पांडु,(सोसायटी सर्वसाधारण)इंद्रजित सुरेश झगडू,(सोसायटी सर्वसाधारण)
माळी जयसिंग देवचंद्र,(सोसायटी सर्वसाधारण)चौधरी हितेश विनोद,(सोसायटी इतर मागासवर्ग)राजपुत अनिलसिंग प्रेमसिंग,(सोसायटी सर्वसाधारण)
पाडवी यमुनाबाई टेडग्या(महिला राखीव)
ग्रामपंचायत मतदार संघ - राजपुत पुंडलिक गोविद,(सर्व साधारण)वळवी दिपक दशरथ(अनूसुचित जमाती)
शिंदे सुरेखा चंद्रकांत,(आर्थिक दूर्बल घटक)क्षत्रिय हितेंद्र सरवनसिंग,(सर्वसाधारण)
व्यापारी मतदार संघ - क्षत्रिय केसरसिंग छोटुलाल,(सर्वसाधारण)
हमाल / मापाडी मतदार संघ -
गाडे रविंद्र सदाशिव(सर्वसाधारण)
वरील प्रमाणे महाविकास आघाडीचे नामनिर्देशन अर्ज भरण्यात आले असुन महाविकास आघाडीचे "शेतकरी पॅनल" ह्या नावाने निवडणुक लढविणार असुन पॅनलचे नेतृत्व (पॅनल प्रमुख) माजी आमदार तथा कृ.उ.बा.स.मा. सभापती उदेसिंग कोचरू पाडवी हे करणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपुत, शहर अध्यक्ष, योगेश मराठे, आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष गटाचे सुरेश इंद्रजित, धनराज मराठे, शांतीलाल गायकवाड, पुनमचंद वळवी, अनिल राजपुत, चंद्रकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रल्हाद मराठे, पुरुषोत्तम चव्हाण, दिपक वळवी, हितेंद्र क्षत्रिय, कुणाल पाडवी, हितेश चौधरी ह्यांनी बैठकीनंतर जाहिर करून निवडणूकीत उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.