केंद्र सरकारकडून गरीब जनतेला रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य वाटप करण्यात येत, परंतु आता महाराष्ट्रातील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
कारण राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी थेट पैसे वितरित करण्यात येणार आहे.
या निर्णयावर मात्र राज्यातील अनेक लोकांनी आक्षेप नोंदवला आणि विरोधकांकडून या निर्णयावर टीका होताना दिसत आहे.
तसेच इतर रेशनकार्ड धारक शेतकऱ्यांनी या निर्णयाचा विरोध केला, परंतु काही शेतकऱ्यांनी हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान शासनाच्या या नवीन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी 150 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना या पद्धतीने पैशांचे वितरण होणार आहे.
म्हणजेच वार्षिक 1800 रुपये प्रति व्यक्ती पद्धतीने या योजनेअंतर्गत आता संबंधित शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.