Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फडतूस नही काडतुस हू, झूकेगा नही साला घूसेगा! फडणवीस

फडतूस नही, काडतुस हू मैं,झूकेगा नही साला घूसेगा - घूसेगा - गृहमंत्री फडणवीस
            मूख्यमंत्रीबाबत फेसबुकवर रोशनी शिंदे हिने आक्षेपार्ह पोस्ट केली.
 या पोस्टवरुन राजकारण तापलं आहे.भाजपा-उद्धव ठाकरेंत विखारी टीका आणि एकमेकांना अपशब्दांचा वापर करत पातळी सोडून आरोप प्रत्यारोप सूरू आहेत.  या पोस्टवरुन वाद उफाळला आणि रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, त्यांना उपचारासाठी रूग्णांलयात दाखल केले आहे. मात्र महिला शिवसैनिकांनी मारहाण केली नसल्याचे सांगत मूख्यमंत्री यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.संबंधित प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. तर रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मारहाण प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
             उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर  फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. एकूणच, गुंडागर्दीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंडमंत्री? मी म्हणत नाही, पण गुंड पोसणारं एक खातं असतं. त्यांनी जाहीर करावं. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना गुंडमंत्री असं खातं तयार करावं”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.या वक्तव्यामुळे भाजप पेटून उठला असून ठाकरेंनी फडणवीस बाबत बेताल वक्तव्य केल्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर फिरू देणार नाही.घरकोंबडा बनवू असा इशारा देण्यात आला आहे.
                सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांबद्दल
“आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री. उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं, झुकेगा नहीं साला घुसेंगा. माझ्या मनात यथकिंचीतही सन्मान राहू शकत नाही. सावरकर गौरव यात्रा तोपर्यंत सुरु राहील जोपर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदुचे लोकं सावरकरांचा अपमान करत राहतील तोपर्यंत सावरकर प्रेमींची यात्रा सुरु राहील", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.