तळोदा दि ६ (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश चौधरी व माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्रीताई चौधरी यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निमित्त आयोजित कार्यक्रमात तळोद्यातील प्रभाग 7 मधील पाडवी गल्ली व प्रभाग 1 मधील आदिवासी समाज पंच मंडळास अन्नदान कार्यक्रमासाठी स्वयंपाकाला लागणारे सर्व साहित्य वाटप करण्यात आले.
दरम्यान यावेळी सकाळी ठीक अकरा वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ गौरव यात्रा संपन्न झाल्यानंतर श्री.योगेशभाऊ चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय येथे साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले. प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष श्री. विजयभाऊ चौधरी, आमदार श्री.राजेशदादा पाडवी, शहर मंडल अध्यक्ष श्री.योगेश चौधरी, माजी नगराध्यक्ष श्री.अजय परदेशी ,माजी उपनगराध्यक्ष सौ.भाग्यश्रीताई चौधरी प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ चौधरी ,जिल्हा संघटन मंत्री निलेश भाऊ माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.यावर वेळी जिल्हा चिटणीस तथा बूथ सशक्तीकरण अभियानाचे संयोजक श्री.हेमलाल मगरे, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, जिल्हा संघटनचे बळीराम पाडवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, कल्पेशभाऊ चौधरी,जितेंद्र सूर्यवंशी,शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी नगरसेवक रामानंद ठाकरे,जालंधर भोई, रमेश नारायण पाटील,दीपक जीवन चौधरी,सर्व बूथ प्रमुख आदिवासी आघाडीचे दारासिंग वसावे,जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिरीष माळी, किरण सूर्यवंशी,विस्तारक कमल परदेशी,सुनील परदेशी,सरचिटणीस पंकज तांबोळी, चिटणीस गोकुळ पवार, उपाध्यक्ष राजकपूर मगरे,माजी नगरसेवक गौरव वाणी,दीपक पाडवी, विविध आघाडी,मोर्चा,सेलचे अध्यक्ष तथा सदस्य ,अरविंद प्रधान,धनराज पाडवी,प्रमोद चौधरी,कौशल सवाई,मनोज परदेशी,गणेश चौधरी,राकेश चौधरी समवेत कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.