धडगाव (प्रतिनिधी) थुवाणी ता धडगाव येथे करसन्या ना-या पाडवी यांच घर सौर ऊर्जा लाईटच्या शार्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याने संसरूपयोगी साहित्य घरातील दोन-अडीच लाख रोकड जळून खाक झाल्याची घटना घडली या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मागणी करण्यात आली आहे.
धडगांव तालुक्यातील थूवाणी येथील करसन्या नाऱ्या पाडवी त्यांची पत्नी पिंजारी करसन्या पाडवी कूटूंबातील ९ जण एकत्र राहतात, घरावर सौर ऊर्जाची प्लेट ठेवली होती अचानक आग लागून घराला आग लागली संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यात स्वतः चे 50हजार रोख, घरकुलचे पैसे 70 हजार रोख, गाय मेली त्याचे पैसे 30 हजार रु करसन्या नान्या पाडवी यांची साली गुजरात येथे कामासाठी राहते त्यांचे ठेवण्यासाठी दिलेले त 60 हजार रोख, दिवली बया-तुल्या पाडवी यांची मुलगी करसन्या नान्या पाडवी काका असल्यामुळे ठेवण्यासाठी 50 हजार दिले होते असे एकुण 2 लाख 60हजार रुपये रोकड जळून नुकसान झाली आहे. तीन कोबडी आणि धान्य 10 क्विंटल, कागदपत्र ,. तुर दाळ-1 क्विंटल, उडीद 1.5 क्विंटल, चवळी 50 किलो, तांदूळ 1.5 क्विंटल, कपडे इतर नुकसान झाले आहे करसन्या नाऱ्या पाडवी यांचे कुटूंबतील 9 लोकांचे कुटूंबातील सदस्यांचे फक्त अंगावर कपडे शिल्लख राहिले आहेत. घर संसाराची राख रांगोळी झाली आहे. शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी आहे.