अक्कलकुवा (प्रतिनिधी)अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी सरी केलीपाड्यात अक्कलकुवा पोलिसांनी निंबीपाटी राऊतपाडयात होणारे बालविवाह रोखनण्याची कारवाई केली आहे.
केलीपाडा येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाहाचे नियोजन होत असल्याच माहिती प्रभारी पोलिस अधिकारी यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे मोलगी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिका-यांनी पोलिस ठाणे स्तरावरील अक्षता सदस्यांच्या मदतीने सरीच्या केलीपाडा गावातएका अल्पवयीन मुलीचा विवाह भगदरीच्या तरूणासोबत निश्चित झाल्याचे समजते. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या घरी जावून तिच्या कुटुंबियांना व नागरीकांना कायदेशीर बाबी सांगून समुपदेशन केले. यावेळी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची माहिती दिली. तसेच निंबीपाटी, राऊतपाडा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह वालंबा गावातील तरुणासोबत निश्चित झाल्याने सदर विवाह होणार होता. परंतू पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावित यांनी अल्पवयीन मुलीच्या आईवडीलांची भेट घेवून समुपदेशन करीत बालविवाह रोखण्यात यश आले. यावेळी मुलीच्या पालकांनी मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर विवाह करणार असतल्याची हमी दिली. नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत बालविवाह रोखले. ही कामगिरी नंदूरबार जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत,सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित, पोलिस निरीक्षक अविनाश केदार, पोह. मोहन शिरसाठ, पोना अतूल गावित, किशोर वळवी, कल्पेश कर्णकार, महिला पोलिस कर्मचारी, सविता जाधव, मोलगी पोलिस ठाण्याचे पोह.दिलवरसिंग पाडवी, पोना मंगला पावरा, पोशि संतोष राठोड, मेघराज पानपाटील, खूशाल माळी यांनी केली.