वैजापूर ता. १५: महाराष्ट्रतील राजपूत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच या समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले जाईल,छत्रपती संभाजीनगर मधे शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येईल व देशाचे संरक्षण मंत्री ना. राजनाथसिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.
दि १४ रोजी छत्रपती संभाजीनगरातील अयोध्यानगरी मैदानावर झालेल्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात जयकुमार रावल यांनी राजपूत समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लागणे दुर्दैवी आहे, असे सांगितले. देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणारे सर्वाधिक राजपूत असताना त्यांना हे सहन करावे लागते हे चुकीचे आहे, असे माजी मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की,भामटा हा शब्द वापरला जाणार नाही, याची घोषणा करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या विनंतीला दुजोरा दिला. त्यामुळे आता आता राजपूत समाजापुढे भामटा शब्द लागणार नाही.असे स्पष्ट केले.
"राजपूत समाज हा सुशिक्षित, उच्चशिक्षत आहे. राजकारणात देखील या समाजाचे प्रतिनिधित्व आहे. या समाजासमोर लागलेला भामटा हा शब्द वगळण्याची मागणी केली जात आहे. आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महासंमेलनातून मी भामटा राजपूत यातून भामटा हा शब्द वगळण्याची घोषणा करतो. राज्य सरकार लवकरच या संदर्भातला प्रस्ताव केंद्राकडे पाठवेल", अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, महाराणा प्रताप यांच्या समर्पणाची आठवण ठेवून यापुढे मुघल काळ न म्हणता महाराणा काळ म्हणायला हवे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.