नंदूरबार दि २४(प्रतिनिधी) भोई समाज महिला मेळावा घेण्याबाबत नंदुरबार जिल्हा भोईसमाज जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न
दि. २३ रोजी भोईराज भुवन, भोई गल्ली नंदुरबार येथे भोई समाज सेवा संस्था नंदूरबारचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण काशिराम वाडीले यांच्या अध्यक्षतेखाली व नंदुरबार शहर भोई समाज यांच्या सहयोगाने जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.
प.पू.संत शिरोमणी श्री भिमा भोई यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
सदरच्या बैठकीत,महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिला मेळावा आयोजित करणे या विषयावर यथायोग्य चर्चा करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वाडीले यांनी सांगितले की,महिला,नारी शक्ती समाज परिवर्तन घडवू शकते, कुटुंबा बरोबर समाज घडवू शकते हे पटवून दिले.
याप्रसंगी लवजिहाद संदर्भात जागरूकता व युवतींना करियर मार्गदर्शन, महिला सबलीकरण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा भोईसमाज सेवा संस्था व नंदुरबार तालुका भोईसमाज यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे ऑगस्ट २०२३ महिला,युवती मेळावा व गुणवंत विद्यार्थीनी सत्कार सोहळा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नंदुरबार जिल्हा भोई समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी महिला मेळावा बाबत स्वीकृती दर्शविली.तसेच जिल्हा युवा अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी युवा कार्यकारिणी जाहीर केली. यांत कार्याध्यक्ष दिपक शिवदे,संघटक दिपक साटोटे , कोषाध्यक्ष अविनाश बेंद्रे , सचिव प्रमोद मोरे , उपाध्यक्षपदी पाच जणांची जयेश मोरे , दिनेश साटोटे , दिनेश ढोले , संजय साठे , दिपक भोई यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित युवा कार्यकारणी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला
तसेच बैठकीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील महिला एकत्रीकरणा वर भर देण्यात येऊन लवकरच महिला जिल्हा कार्यकारणी गठीत करणे तसेच समाजातील शासकीय/निमशासकीय तसेच निवृत्त कर्मचारी यांची जिल्हा समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले.
सदरच्या बैठकीत समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे यावर चर्चा झाली.
बैठकीस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वाडीले, कार्याध्यक्ष राजू तावडे ,जिल्हा संघटक रामकृष्ण मोरे,कोषाध्यक्ष विनोद वानखेडे,सह कोषाध्यक्ष पंडित धनराळे, जिल्हा उपाध्यक्ष सोनवणे रावसाहेब,प्रकाश वानखेडे ,रविंद्र ढोले युवा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे ,विवाह समिती अध्यक्ष महेन्द्र साठे, माजी सचिव मोहन मोरे , नंदुरबार तालुका अध्यक्ष पंकज शिवदे,जिल्हा कायदे विषयक सल्लागार प्रकाश वानखेडे,संजय साठे,चंद्रकांत नुक्ते, राजू लाडे, गजानन निकवाडे, अमृत तावडे,अशोक वाडीले,मोहन साठे,अविनाश बेंद्रे,प्रा.नीलकंठ धनराळे,मदन मोरे,नंदुरबार तालुका सचिव प्रा.दिनेश वाडेकर,किशोर ढोले,राजाराम नुक्ते,जगदीश वानखेडे,चंद्रकांत साठे,गणेश ढोले आणि विविध तालुक्यातील मान्यवर, पदाधिकारी,समाज बांधव व नंदुरबार येथील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव चंद्रवदन मोरे यांनी केले शेवटी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भगवान ढोले यांनी प.पुज्य. श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमांचे वाटप केले.व राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.