नंदुरबार दि २४(प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोन सूपूत्रांनी यूपीएससी च्या परीक्षेत देशात महाराष्ट्रासह नंदूरबार जिल्ह्याचा नावलौकिक मिळविला आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोळदे ता नंदूरबार गावाचे सुपुत्र प्रशांत गजेंद्रसिंग राजपूत याने UPSC परीक्षेत 97 all india रँक मिळवून यश संपादन करून नंदुरबार जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
नंदुरबार येथील प्रसिद्ध ड्रायफ्रूट व्यापारी सी एम ट्रेडर्स चे मालक महेंद्रभाई तातेड यांचे चिरंजीव जैनम महेंद्रकुमार तातेड यांनी UPSC परीक्षेत All india Rank 103 IPS परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नंदुरबार जिल्ह्याचे नाव लौकीकात भर टाकली आहे. एकाच वर्षी जिल्ह्यातील दोन जणांनी Ranking मध्ये आल्याने जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय पदाधिकारीकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश