नंदूरबार दि २४(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्रातल्या इमारत आणि इतर बांधकाम कामगारांसाठी मोफत मध्यान भोजनाची योजना महाराष्ट्र सरकार तर्फे राबवली जात आहे. त्या अंतर्गत नंदुरबार येथे मध्यान भोजन योजनेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं.
खा डॉ हिनाताई गावित व पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते याप्रसंगी भोजन वाढून योजनेचा शुभारंभ करण्यात आला . प्रसंगी डॉ गावित म्हणाले, बांधकाम कामगार बांधवांनी मध्यान्न भोजन घेऊन आपल्या शरीराची ही काळजी घ्यावी जेणेकरून ते करत असलेल्या कामात त्यांना अधिक उत्साह आणि ऊर्जा मिळेल आणि त्यामुळे उत्कृष्ट बांधकामाचे नमुने ते तयार करू शकतील असे यावेळी सांगितले महाराष्ट्र शासनाची ही अतिशय स्तुत्य अशी योजना आहे. त्यामुळे उन्हातान्हत, पाऊस पाण्यात काम करणाऱ्या कामगार बांधवांना फार मोठी मदत होणार आहे.