नवागांव येथील स्मशानभूमी कामावर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आलेला निधी फक्त कागदावरच जितेंद्र पावरा यांचा ग्रामपंचायत ला प्रश्न ?
शिरपुर :- बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव पाड्यासाठी सन 2021 मध्ये 15 वा वित्त आयोग निधीतून 5 लाख 22 हजार रुपये शासनाने मंजूर सुध्दा करुन देण्यात आला होता त्याकामाचा शासनाने सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 कालावधी देण्यात आला होता सन २०२२ चा आपला गाव आपला विकास आराखडय़ात सुध्दा ग्रामपंचायत ने कामे घेतले असुन सुध्दा त्या कामाला 3 वर्षा झाले असून देखील आजही नवागांव येथील स्मशानभूमी चे काम सुरू करण्यातात आले नसल्याचे दिसून येते आहे.
शासनाने अत्यंत आवश्यक असल्याले कामांना मंजुरी देऊन निधी सुध्दा ग्रामपंचायत ला पाठवले असुन देखील 3 वर्ष पूर्ण होऊन देखील ग्रामपंचायत कामाला सुरुवात करत नसेल तर आलेला निधी फक्त कागदावरच का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वरील विषयानुसार दि:- 25/2/2023 रोजी जितेंद्र पावरा यांनी ग्रामपंचायत ला ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडे अर्ज सादर केला तसेच दि:- 17/3/2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना अर्ज दाखल करण्यात आले तसचे दि 4//5/2023 रोजी ग्रामपंचायत ला स्मरण पत्र व दुसरे निवदेन सादर करण्यात आले जर स्मशानभूमी कामासाठी वारंवार पाठपुरावा करुन सुध्दा ग्रामपंचायत या विषयावर दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.