सातपुडा मिरर.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकाच दिवशी दोन सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिजी या देशाने 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी २०२३ आणि पापुआ न्यू गिनी देशाने 'द ग्रैंड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतर देशांकडून सन्मानित करण्यात आलेली ही पहिली वेळ नाही तर आतापर्यंत नऊ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान केली आहे. 2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना 'अब्दुलाझीझ अल सौद' हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर देखील पुरस्काराची मालिका सुरूच राहिली.
2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार' या अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सनमानित करण्यात आले आहे. अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव अफगाणिस्तानचे राष्ट्रीय प्रमुख अमानुल्लाह खान ( गाजी) यांच्या नावावर ठेवण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे ते स्वातंत्र्यवीर होते.
फिलिस्तीनमध्ये देखील सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 साली फिलिस्तीनच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांना 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2019 साली संयुक्त अरब अमीरातला (United Arab Emirates) भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ जायद' (Order of Zayed) ने सन्मानित करण्यात आले.2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू' सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शेजारी असणाऱ्या मालदीवने देखील त्यांना 'निशान इज्जुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. बहरीनने 2019 साली हमाद 'ऑर्डर ऑफ दि रेनेसां', 2020 साली अमेरिकेनै 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्काराने सन्मानित केले. तर भूतानने 2021 साली मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ दी ड्रक गियल्पो' पुरस्काराने सन्मानित केले.