तळोदा दि २९(प्रतिनिधी) नगर परिषद हद्दीत असलेल्या श्री. कालिका देवी मंदिर ते डि.बी. हट्टी लगत असलेल्या अक्कलकुवा रस्त्यावरील खर्डी वरील पुलाची दुरूस्ती करण्यात यावी असे निवेदन टायगर गृपने मुख्याधिकारी यांना दिले आहे.
निवेदनाचा आशय असा की, तळोदा नगर परिषद हद्दीत असलेल्या श्री. कालिका देवी मंदिर लगत ते डि.बी. हट्टी पावेतो अक्कलकुवा रस्त्यावरील खर्डी नदीवर पुल ५० ते ६० वर्षापुर्वीचा असून, पुलाची दुरावस्था झालेली आहे. तसेच पुलाला प्रथम दर्शनी पाहता पुलाचे दोन्ही बाजूचे कठडेच नसल्याचे दिसून येते, परिसरातील नागरिकांना सदरील पुलाबाबत विचारणा केली असता पुलाचे कथडे ५ वर्ष पासून पुराचा पाण्यात वाहून गेली असल्याचे सांगितले, मागील पाच वर्षापासून पुलाचे कठडे बांधण्यात आलेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही दिवसानंतर मान्सून ऋतु सुरु होणार असल्याने नदीला पाणी येण्याची शक्यात नाकारता येत नाही. तसेच पुराला पाणी आल्यास पुलाचा पलीकडील वस्तीवरील नागरीकांना जिवाचा धोका होऊ शकतो. तसेच जवळील परिसर संपूर्ण आदिवासी वस्तीचा असल्याने तेथील रहिवासी सकाळी लवकर कामावर निघून जातात व त्यांची लहान मुले, मुली पुलावर खेळतांना दिसून येतात. तरी सदरील पुलावर कठडे नसल्याने जीवितहानी कधीही होऊ शकते, तळोदा शहरात मोठ्या प्रमाणात विकास होत असतांना एका विशिष्ट परिसरात दुर्लक्ष करणेची बाब गंभीर स्वरूपाची असल्याने सदरील ठिकाणी योग्य ती कार्यवाही त्वरीत करण्यात यावी. तसेच सदर जागेवर योग्य ती कार्यवाही न केल्यास आमच्या संघटेकडून आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.असे निवेदन शहराध्यक्ष शूभम खाटीक व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी सपना वसावे यांना देण्यात आले आहे.