तळोदा दि २९(प्रतिनिधी) शहरात पावसाळा सुरु होण्यापूर्वी गटारी व नाले साफसफाई करण्यात बाबत तळोदा शहर सामाजिक कार्यकर्ते
तर्फे नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनाचा आशय असा तळोदे शहरातही नागरिक राहतात याच्या जणू काही नगरपालिकेस विसर पडलेला दिसतोय. शहरात असलेल्या गटारी साफ करण्यात आलेल्या नाही. नाले साफसफाई याकडे पालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून येणाऱ्या पावसाळ्यात गटारी तुडुंब भरून रस्त्यावर गटाराचे पाणी वाहून घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराई पसरण्याच्या संकटा समोर नागरिकांना जाण्याची वेळ केवळ आणि केवळ आपल्या दुर्लक्षामुळे येऊ शकते केंद्र सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकांना प्रोत्साहन देत आहे. तरी आपल्या नगरपालिकेच्या वतीने एवढी उदासीनता का? खबरदारी म्हणून पावसाळा सुरु होण्यापूर्वी लवकरात लवकर गटारी, नाले साफसफाई करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्यापासून वाचवावे.असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देताना संतोष वानखेडे, धनलाल शिवदे,शिवदास साठे,मधुकर रामोळे, जगदीश वानखेडे,चंद्रकांत भोई, गणेश शिवदे,मयुर ढोले, नीरज रामोळे,विक्की कुंभार, सचिन भोई आदी उपस्थित होते