अक्कलकुवा दि २९(प्रतिनिधी) पेचरिदेव ता अक्कलकुवा येथील जयवंत पाडवी यांचे पत्र्याचे शेडलगत मोकळ्या जागेत जुगार अड्ड्यावर धाड टाकून वाहने मोबाईल व रोख असे सुमारे १३,३९,५६० रु मुद्देमाल जप्त केला आहे १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील पेचरिदेव परिसरात एका पत्र्याच्या शेडलगत सार्वजनिक जागेत आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळतांना तेरा जण मिळून आले. त्यांच्या ताब्यातील सहा मोबाईल किंमत ६१,५०० रुपये, रोख रक्कम १८,०६०/- रुपये, आठ मोटरसायकल किंमत २.६०,०००/- रुपये ,दोन चारचाकी वाहने किंमत १०,००,०००/- रुपये एकुण १३,३९,६६०/- रुपये किंमतीचा. मुद्देमाल मिळून आला आहे.
पोहे रवींद्र पाडवी नेम मा. वि. पो. विशेष पथक मुळ नेमणूक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदूरबार यांच्या फिर्यादीवरून पोलिसात जयवंत राध्या पाडवी रा.उदेपुर ता. अक्कलकुवा , सलमान मुसा दावजी वय ६३ रा सिदात फलीया गुजरात, संतोषभाई सामाभाई वसावा वय ४० रा सलेबा गुजरात, राजेश कुंजीलाल कुशवाह वय ३८ रा वराछा रोड गुजरात, विनय उर्फ विशाल धरमसिह रबारी वय २८ रा. कठोर गुजरात, जयराम उर्फ जयेश बरवाभाई रबारी वय ४९ रा अमरोली गुजरात, रफिकभाई देवाभाई अरब वय ४० रा सेलंबा गुजरात, विशाल प्रकाशभाई अध्यारु, वय ३१ रा विशावगा गुजरात, सलीम अकबर राठोड वय ३६ रा अरबटेकडा गुजरात, आमील ईसाक मन्सुरी वय ५० रा सेलंबा गुजरात, प्रित चंदुलाल ठुमर वय ३९ रा कडोदरा गुजरात, संजय तडवी रा- खापरकोराई अ कुवा, इम्रान मकराणी पुर्ण नाव माहित नाही. आदी स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी ५२ पत्याच्या कॅटवर पैसे लावून घेवुन झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना वरील वर्णनाचा मुद्देमाल कॅटसह मिळून आले म्हणुन 13 जणांवर अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोउनि जितेंद्र महाजन हे करीत आहेत. आरोपीत अटक नाही.अशी माहिती प्राप्त झाली आहे.