तळोदा दि २२( प्रतिनिधी) सातपुडा मशरूम उद्योग केंद्र देवमोगरा पूनर्वसनचे उद्योजक राजेंद्र वसावे शिका, शिकवा आणि कमवा या त्रिसूत्रीचा वापर करून तरुणांमध्ये मशरूम शेतीची अल्प भांडवलात व्यवसाय व रोजगाराची चळवळ चालवित आहेत.
लग्न समारंभात भेट म्हणून पैसे, वस्तू न देता मशरूम किट देण्यासाठी ते आग्रही असतात,त्यांचे कार्य पाहता त्यांच्या मशरूम केंद्राला अनेकांनी भेट दिली आहे.व मशरूम पासुन बनवलेले मशरूम पोहा, मशरूम पुलाव, मशरूम केक,आदींचा स्वाद घेतला आहे.
नॅचरोपॅथी हॉस्पिटल नंदुरबार येथे 20 मे ला कार्यक्रम झाला होता. मशरूम शेती ते मार्केटिंग पर्यंतच्या या कार्यक्रमात भारतातील अनेक राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
शिका,शिकवा आणि कमवा या पद्धतीने युवा उद्योजक मशरूम शेती व्यवसाय राजेंद्र वसावे करीत आहेत मशरूम उत्पादक संदीप पाडवी सपोर्ट टीम म्हणून काम करीत आहेत.
राजेंद्र वसावे यांचे प्रयत्न व तळमळ पाहत उत्पादनाचा उपयोग झाला पाहिजे म्हणून त्यावरील विविध रेसीपी विचारणा होते आहे.
पोलिस निरीक्षक शिरपूर आसाराम आगरकर साहेब देव मोगरा पुनर्वसन येथे भेट दिली असता त्यांना पळसाच्या पानात कोणतेही मसाला विना तेल फक्त मशरूम हिरवी मिरची लसूण मीठ मशरूम रेसिपी करून दिली. जिल्हाधिकारी श्रीमती.मनीषा खत्री नंदुरबार तळोदा तालुक्याचे प्रकल्प अधिकारी मंदार फक्ती अक्कलकुवा तालुक्याचे तहसीलदार श्रीमान.राठोड व अन्य अधिकारी यांनी केंद्राला भेट दिली तेव्हा पळसाच्या पानात बनवलेली मशरूम रेसिपी ची टेस्ट घेतली व मशरूम युनिटचे कौतुक केले..
कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार हेडगेवार सेवा समिती यांच्या माध्यमातून कॉलेजमधील विद्यार्थी प्राचार्य व कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ श्रीमान.पद्माकर कुंदे मशरूम युनिटला देवमोगरा पूनर्वसन येथे भेट दिली तेव्हा मशरूम पोहाचा आस्वाद घेतला आहे .
मशरूम शेतीला 43 सेल्सियस तापमान आद्रता 35 पोषक वातावरण 20 ते 30 सेल्सिअस डिग्री च्या आत पाहिजे.कोणत्याही आधुनिक सुविधा व औजारांची गरज नाही. मशरूम तयार करण्यासाठी मानसिकता तयार करावी लागते प्रबल इच्छा शक्ती असली पाहिजे.असे या केंद्राचे संचालक राजेंद्र वसावे यांनी सांगितले.