तळोदा कृउबा उपसभापती व खविस व्हाईस चेअरमन यांचा आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सत्कार संपन्न
May 26, 2023
तळोदा दि २६(प्रतिनिधी)तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती व तळोदा तालूका खरेदी विक्री संघाची निवडणूक सर्व राजकीय पक्षांच्या सामंजस्याने बिनविरोध झाल्या आहेत.यांत माजी आमदार उदेसिंगदादा पाडवी यांची भूमिका महत्त्वाची होती.दोन्ही संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समर्थक ही पदाधिकारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.यानिमित्ताने दि २६ रोजी मुक्ताईनगर येथे माजी मंत्री तथा आमदार एकनाथरावजी खडसे यांच्या निवासस्थानी मा.उदेसिंग दादा पाडवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी राष्ट्रवादीकडून श्री हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय तसेच तळोदा तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाच्या व्हाईस चेअरमनपदी राष्ट्रवादीकडून श्री पुरुषोत्तम चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना लोकनेते एकनाथरावजी खडसे साहेब मा.आमदार उदेसिंग दादा पाडवी साहेब राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ. रामराव आघाडे, पक्षाचे शहादा- तळोदा विधानसभा अध्यक्ष श्री कुणाल पाडवी,शहराध्यक्ष योगेश मराठे सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी,डॉक्टर सेलचे डॉ.तुषार जी सनसे.आदी उपस्थित होते.