Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्याभिषेक दिनानिमित्त शिव वंदन व रायगडाची पवित्र माती घेण्यासाठी शिवप्रेमी, देशभक्त, संस्कृती रक्षक, धर्माभिमानी यूवक मोटरसायकलीने रायगडाकडे मार्गस्थ

तळोदा दि २६(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्याभिषेक दिनानिमित्त शिव वंदन व रायगडाची पवित्र माती घेण्यासाठी शिवप्रेमी, देशभक्त, संस्कृती रक्षक, धर्माभिमानी यूवक मोटरसायकलीने रायगडाकडे मार्गस्थ झाले.यावेळी त्यांचावर फूलांचा वर्षाव करत "जय भवानी, जय शिवाजी" जयघोषात प्रस्थान केले आहे.
            तळोदा-शहादा तालुक्यातील  हिंदु बांधवांचे
प्रतिनिधीत्व करीत शिवाजी महाराज यांचा  350 वा राज्याभिषेक दिनानिमित्त  तळोदा व शहादा येथुन मोटारसायकलीने तरूण बांधव रायगड येथे रायगडावरील पवित्र माती घेण्यासाठी निघाले आहेत.शहादा येथील हिंदुत्ववादी संघटनांनी  मिळून सर्व तरुणांसोबत शिववंदन केले व दोंडाईचे येथील हिंदुत्ववादी संघटना कडून अल्पोपहार देण्यात आला. व मालेगाव येथील अग्निवीर संघटनेचे गोरक्षक यांच्या कडून जेवणाचे नियोजन करण्यात आले होते.पुढे नाशिक येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिवकालीन शस्त्रास्त्रे प्रशिक्षण वर्गात स्वागत व  शिववंदन करण्यात आले नाशिक येथील इस्कॉन  मंदिरात रात्री भोजनाची व‌निवासाची  सुविधा करण्यात आली व शिवस्मारक पाथर्डी फाटा येथे शिवरायांच्या जयघोषाने शिववंदन व पुष्पवृष्टी करण्यात आली.  विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वस्तीगृह घोटी येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.रस्त्यात गावोगावी शिवप्रेमी कडून स्वागत करण्यात आले आहे.