Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमलाड बोरद रस्त्यावर उमरी व मोडच्या मध्ये भरधाव वेगाने मोटारसायकल झाडावर आदळून एकाचा मृत्यू

 तळोदा दि २०(प्रतिनिधी)
आमलाड बोरद रस्त्यावर उमरी व मोडच्या मध्ये भरधाव वेगातील मोटरसायकल झाडावर आदळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
          याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रतापसिंग राजेंद्र ठाकरे वय (४८, रा. रापापूर ता. तळोदा हा भरधाव वेगाने तळोदा तालुक्यातील उमरी ते मोड रस्त्यावर मोटरसायकल  नं GJ 21 N4392 वर जात असतांना रस्त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून बाजुला असलेल्या झाडावर मोटरसायकल आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. तसेच मोटरसायकलीचा चक्काचूर झाला. याबाबत विश्वजीत ठाकरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार तळोदा पोलीस ठाण्यात मयत प्रतापसिंग ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गौतम बोराळे करीत आहेत.