शिरपूर दि २७(प्रतिनिधी)
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.एस. आगरकर यांना गोपनीय माहिती मिळाल्याने सापळा रचून संशयीत ट्रक अडवला असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधीत तंबाखू असल्याचे आढळून आले. वाहतूक करणारा आरोपीत वाहनसह चाळीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे
ट्रकमध्ये १९,७४,०००/- रू. किं.ची सुगंधीत तंबाखू २०,००,०००/- रू. किं.चे आयसर असा एकुण ३९,७४,०००/- रू. किं. चा मूद्देमाल व
वाहनासह ०१ आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
शिरपूर शहर पो.स्टे.चे पोनि आगरकर सो यांना दि.२७ मे २०२३ रोजी रात्री २.१५ वाजेचे सुमारास गुप्त बातमी मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडुन शिरपुरकडे आयसर वाहन क्र.UP 53 E T 0241 असे वाहन येत असुन त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू भरलेला आहे. त्यानुसार पोनि आगरकर यांनी पोसई संदिप मुरकुटे यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने श्री मुरकुटे यांनी डी. बी. पथकासह शहादा फाटा, कळमसरे शिवार ता. शिरपूर जि. धुळे येथे पंचांसह सापळा लावला असता. राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडुन शिरपूरकडे येणारे आयसर वाहन क्र. UP 53 E T 0241 असे ३.०० वाजेचा सुमारास शिताफीने पकडले असता सदर वाहनावरील चालक जमाल अली अहमद वय ४८ रा. नारायचा जाफरगंज ता. बिडकी जि. फतेहपुर हासवा राज्य उत्तर प्रदेश हा सदर वाहनात प्लॅस्टीक फिल्म मालाचे आडोशास १९,७४,०००/- रू. किं.ची भोला छाप सुगंधीत तंबाखू भरलेले पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीकचा गोण्या असलेले ९ कार्टुन व पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीक गोण्या असलेले ४१ कार्टुन असे एकूण ५० कार्टुन नेतांना मिळुन आल्याने सदरचा माल महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधीत असल्याने सदर मालासह २०,००,०००/- रू. कि.चे आयसर वाहन क्र. यु.पी. ५३/ इ.टी.०२४९ सह एकुण ३९,७४,०००/- रू. किं.चा मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांना पत्रव्यवहार केल्यानुसार अन्न व सुरक्षा अधिकारांनी शिरपूर शहर पो.स्टे.ला येवून वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती सरकारतर्फे फिर्यादी होवुन गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्यात आरोपी नामे जमाल अली अहमद यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड धूळे,अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, यांचे मार्गदर्शना खाली ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, पोउनि संदिप मुरकुटे, तसेच डी.बी.पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील,लादूराम चौधरी,पोना मनोज पाटील, पोकॉ योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्निल बांगर,अमित रणमळे,मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ,भटु साळंके, प्रविण गोसावी तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे