Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदाराची वारी आपल्या दारी कार्यक्रम अंतर्गत आमदार आमशा पाडवी यांच्या जनता दरबारात अधिका-यांना समस्या सोडवण्याचा सूचना

धडगाव दि २८ (प्रतिनिधी) आमदाराची वारी आपल्या दारी कार्यक्रम अंतर्गत आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत धडगाव तालुक्यातील अधिकारी, नागरिक व लोकप्रतिनिधींचा उपस्थितित जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
शासकीय, निमशासकीय कार्यालयाशी संबंधित  जनतेचे प्रश्न एकत्र बसून सुटावेत या उद्देशाने धडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवण्यात आला. प्रसंगी सर्वसामान्यांचा तक्रारी ऐकून घेत आमदार पाडवींनी ऐकून घेत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. जनतेचे समस्या सोडवण्याचा सूचना दिल्या. 
              या वेळी महिला व बालविकास,विज वितरण, बांधकाम, ग्रामविकास, आरोग्य, पोलिस, शिक्षण,कृषी, महसूल, वनविभाग,या सह सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात उपस्थितांनी तक्रारी, प्रश्न मांडले. यात तोरणमाळ पासून  तालुक्यातील डोंगर कपारीतून, कानाकोपऱ्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात जनतेने कामे होत नसल्याचा  तक्रारी केल्या. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना कामचुकार कर्मचारी व अधिका-यांना यावेळी आमदार
पाडवी यांनी जाब विचारला,जनतेची कामे प्रामाणिकपणे करण्याची सूचना दिली. यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या प्रलंबित सातबारा नोंदी व दुरूस्ती, शिधापत्रिका, पी एम किसान, वन पट्टे दावे, कृषी विभागाच्या योजना, रोहयो व वनविभागतल्या अडचणी, तोरणमाळ व गौ-या भागात पाणी टैंकर चालू करण्याविषयी सूचना आमदार पाडवींनी तहसीलदारांना दिली. पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, वनविभाग, बांधकामासह अन्य विभागांसंदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. त्या तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारींचा निपटारा
लवकर करावा अशी सूचना देण्यात आली.
                 यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके, जि.प. समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, शिवसेनेचे जिल्हा संघटक रामभाऊ वाडिले, शिवसेना जिल्हा युवाचे ललित जाट, जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, सामाजिक कार्यकर्ते गोलू चंदेल, जसू पवार, हर्षल बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकतें व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.