नंदूरबार दि १७(प्रतिनिधी) मानव विकास प्रकल्प अंतर्गत स्वयंम सहाय्यक समूहातील बी.सी. यांना आणि महिला बचत गटांना लॅपटॉप व प्रिंटर वाटप करण्यात आला आहे.
महिला बचत गटांना लॅपटॉप आणि प्रिंटर मूळ शासनाच्या अनेक योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचता येणार आहेत तर महिला बचत गटांकडून बनवण्यात येणाऱ्या वस्तू विक्री करणं चांगले आणि सोपे काम होण्यास काम करण्यास मदत मिळणार आहे.
लॅपटॉप आणि प्रिंटर वाटपाच्या कार्यक्रम जिल्हा परिषद सभागृहात झाला यावेळी संसद रत्न खासदार डॉ. हिनाताई गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, शिक्षण सभापती गणेशदादा पराडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, यांच्यासह महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.